चितोड गड इतिहासाच्या पडद्यावरचं आणखी एक महत्त्वाचं शहर.
चित्तोडगड इतिहासाच्या पडद्यावरचं एक महत्त्वाचं शहर
इसवी सन तेराशे तीन चा काळ होता. त्यावेळी राजपुतांची महाराणी असलेल्या पद्मिनी यांच्या सौंदर्याबद्दल च्या गोष्टी ऐकून पागल झालेल्या एका न र पशु ने चित्तोडगड बेचिराख केले. मग आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी असंख्य माता भगिनींनी जोहारचा मार्ग स्वीकारला. तेच हे चितोडगड. इथल्या किल्ल्याला चार महत्त्वाची महाद्वारे आहेत. पाडाल पोल , भैरव पोल , राम आणि हनुमान पोल अशी त्यांची नावे आहेत.
चित्तोडगड मध्ये पाहण्यासारखी जी महत्त्वाची ठिकाणे आहेत त्यापैकी विजय स्तंभ हा विशेष आहे. सण 14 40 मध्ये गुजरात आणि माळवा प्रांतातल्या मुस्लिम सुलतान वर विजय प्राप्त केल्यानंतर महाराणा कुंभ यांनी विजयस्तंभाची उभारणी केली.
किर्ती स्तंभ हेसुद्धा असंच एक महत्त्वाचं ठिकाण त्याची उभारणी पहिले जैन तीर्थंकर आदिनाथ जी यांच्या नावे एका जैन व्यापाऱ्याने केली. राणा कुंभ यांचा पॅलेस आज भग्नावस्थेत आहे. त्याला जमिनीखाली गुप्त दालने आहेत जिथे हा जो हार झाला होता. इथून जवळच राणी पद्मिनी चा महाल पण आहे. महालाजवळ एक एक छोटा तलाव आहे. काही अंतरावर राजकन्या मीराबाई यांचं मंदिर आहे.
चितोडगड च्या पुढे कुंभळगड आहे. कुंभाळगड चा किल्ला मोठा बळकट आहे. एका अंधार्या रात्री राजकुमार उदय सिंग यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या दाईने त्यांना रातोरात कुंभळगड च्या अभेद्य किल्ल्यात सुखरूप पोहोचवले. कारण राजकुमाराचा काटा काढून त्यांच्या काकाला राजसिंहासन मिळवायचे होते. मोठे झाल्यावर राजकुमार उदयसिंग यांनी याच किल्ल्यातून आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली. कुंभळगड जवळच हलदी घाट आहे. इथेच महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले होते. रणकपुर येथील जैन मंदिर खरोखरच खूप सुंदर आहेत अगदी चुकवू नये इतकी सुंदर. इथून जवळच माउंट अबू सुद्धा आहे. उदयपूर चितोडगड कुंभळगड हलदी घाट माऊंट अबू या सर्वांचे मिश्रण म्हणजे एक छानशी टूर होते. गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारी आणि मनाला भुरळ पाडणारी ही ठिकाणं एकदा तरी पाहायलाच हवीत.
जग पॅलेस
राजेंद्र खडपे
कौस्तुभ ट्रॅव्हल्स
Comments
Post a Comment