पहेलगाम जणू आनंदाचे धाम
पहेलगाम एक उंचच उंच प-हाड यांनी वेढलेलं आणि हिरव्यागर्द वनराईने नटलेले देखणं टुमदार असं गाव. अगदी लहानपणी ऐकलेल्या परीकथेतल्या गावा सारखं गाव. इथे उन्हाळा जणू माहीतच नाही. अगदी मे महिन्यात आलो तरीही छान झुळझुळ हवा जणू गुदगुल्या करून जाते. पहेलगाम "शेपर्ड व्हिलेज "म्हणून ओळखलं जातं.
बेताब व्हॅली हे लक्षात राहण्याजोगे एक ठिकाण, इथे सनिदेवल च्या बेताब सिनेमाचं शूटिंग झालं होतं आणि म्हणून त्याचं नाव बेताब व्हॅली पडलं. लीडर नदीचा खळाळत जाणारा प्रवाह, डोळ्यांचं पारणं फेडणारा निसर्ग पाहिला की मन हरखून जातं. उंचच उंच हिमशिखर आंकडे बघितलं की माणसाचा खुजेपणा कुठेतरी जाणवल्याशिवाय राहात नाही. तिथल्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर मग 11 फोटो क्लिक करण्याची जणू मालिकाच सुरू होते. बेताब व्हॅली च्या वरच्या बाजूला अरु व्हॅली आहे . तिथलं निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात किती टिपून घेऊ असं होतं. म्हणून ट्रीपला येण्यापूर्वी नव किंवा पूर्ण रिकामा असलेलं मेमरी कार्ड घेऊन यायला विसरू नका. त्यानंतर जायचं चंदनवाडी ला आणि बर्फात खूप धमाल करायची. अगदी वय विसरून जाऊन बर्फात मस्ती करायची. असे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा तुमच्या जिवलग आन सोबत अनुभवण्याचे भाग्य तुम्हाला लाभो. बर्फ द्यायचं म्हणजे मग सन स्क्रीन लोशन लीप बाम आणि चेहऱ्यावरचं हास्य खुलवणारा आणि फुलवणारा छानसा गॉगल पण हवाच. बाकी ग्लोज गम बूट स्नो सुट इथे भाड्याने पण मिळतात. की सूट घालून छान पैकी फोटो क्लिक करून घ्या. त्यासाठी स्की इन ग येण्याची गरज नाही. फोटो मात्र रुबाबदार आले पाहिजेत . हे सगळे फोटोज आपण निवांतपणे पुन्हा पाहत असतो ना तेव्हा मन कसं प्रसन्न होतं असं वाटतं की आताही आपण अजून बर्फात उभे आहोत .
सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून पहलगाम मध्ये रिवर राफ्टींग ची ही मजा लुटता येते . आयुष्यात एकदा तरी हा रोमांचकारक अनुभव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. कधी चेहऱ्यावर हसू येतं तर कधी छातीत धडधड वाढते आणि पाणी अंगावर चेहऱ्यावर उडालं कि ते पुसताना पण तारांबळ उडते. असाया रोमांचक खेळाची मजा काही औरच आहे. पहेलगाम ला येताना वाटेत सफरचंदाच्या बागा अर्थात एप्पल गार्डन्स सुखावणारं दर्शन होतं . मग इथल्या स्टॉल्सवर ताज्या ताज्या सफरचंदाचे जेम्स पिकल्स आणि अशा बऱ्याच गोष्टींची कळत-नकळत खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. वाटेमध्ये पेम पोर गाव लागतं. इथे ड्रायफ्रूट आणि केशर अस्सल दर्जाचे मिळतं. श्रीनगरला परत जाताना वाटेत खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही असा आणखी एक स्टॉप म्हणजे म्हणजे क्रिकेट बॅट फॅक्टरीज . सोबत बच्चेकंपनी असेल तर बॅट घेतल्याशिवाय मग बाबांची सुटकाच नाही . हॉटेलच्या रूमवर परत आल्यानंतर ही सगळी खरेदी निरखून बघत बघत ड्रायफ्रूट चा स्वाद घेत सगळं बघण्याची मजा पण वेगळीच आहे . काश्मीर ला आल्यानंतर क ह वाचा वेगळा स्वाद चाखला पाहिजे.
ट्रिपचा प्रत्येक दिवस म्हणजे धमालच असते . खरंतर दूरवरचा प्रत्येक दिवस अगदी सणा सारखाच असतो . तर मग आता लवकरच ट्रीपच्या तयारीला लागायचं कारण श्रीनगरला येऊन ट्यूलिप गार्डन पण पाहायचे आहेत ना !!
राजेंद्र खडपे
कौस्तुभ ट्रॅव्हल्स
9987239082
Comments
Post a Comment