उदयपूर एक गौरवशाली परंपरा असलेलं शहर
उदयपूर
उदयपूर म्हणजे एक गौरवशाली परंपरा असलेले एक शहर जिथे निळाशार तलावाजवळून रंगांची उधळण करत येतो सूर्यदेव आणि मग इथला सूर्यास्त युवा सूर्योदय पाहून एखाद्या कवीची लेखणी सरसावली नाही तर नवलच म्हणायचं.
इथल्या हवेल्या सुंदर मंदिर आणि रम्य अशी उद्या न पाहिली की वाटतं लहानपणी परी कथेत वाचलेल्या गावात तर नाही आलो ना आपण!
उदयपुर शहर हा राजस्थानच्या मेवाड प्रांतातला शिरोमणी च आहे जणू इथून जवळच अबू चा पहाड पण स्थित आहे माउंट अबू हे एक छोटेखानी हिल स्टेशन आहे. रणकपुर इथली जैन मंदिर म्हणजे वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे आणि माउंट अबू ची दिलवाडा मंदिर थक्क करून सोडतात. रजपुतांचे दैवत असलेला एकलिंगजी आणि नाथद्वारा येथील श्रीकृष्ण मंदिर ही मंदिर बघण्याजोगी आहेत. या सगळ्यांचं शब्दात वर्णन करण्यापेक्षा तिथं जाऊन हे अनुभवून हा खरा आनंद आहे. सिटी पॅलेस हा पाहण्यापेक्षा त्याचा इतिहास समजून मग पाहिला तर मग आपण या गौरवशाली इतिहासाचे वारस असल्याचा जो आनंद होतो तो औरच आहे. नाहीतर इकडे तिकडे उभा राहून की काही सेल्फी काढल्या आणि त्या सोशल मीडियावर कितीही पोस्ट केल्या तरीही मनाचं खरं समाधान होणार नाही. अशीच एक वाटिका आहे आणि ती म्हणजे सहेलियों की बाडी राणा संग्रामसिंग यांनी राजघराण्यातील स्त्रियांना विरंगुळा म्हणून ही वाटिका बनवून घेतली होती. इथून जवळच एक म्युझियम पण आहे जिथे इथल्या वैभवशाली इतिहासाची एक झलक बघायला मिळते. बागोरे की हवेली हे पण एक असंच ठिकाण जे न चुकता बघायला हवं किंवा त्याचं ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याचं महत्त्व समजून मग बघायला हव. महाराणा सज्जन सिंग यांनी बनवून घेतलेली गुलाब बाग ती पण खास आहे. उदयपूर हे तलावांचे शहर आहे विस्तीर्ण आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले हे सुंदर तलाव या शहराचे अलंकार आहेत. फतेहसागर तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तीन बाजूने भव्य असे पहाड आहेत आणि त्याच्यासमोर आहे ते महाराणा प्रताप यांचं स्मारक. महाराणा प्रताप अकबराच्या समोर कधीही झुकले नाहीत. त्यांचं स्मारक बघताना तुमची छाती अभिमानाने रुंद होईल. पिचोला लेख सुद्धा मिस करू नका कारण त्याच्या बाजूला सुंदर सुंदर हवेल्या आहेत. जग मंदिर आणि जग निवास खऱ्या अर्थाने पहायला हवेत. असं हे गौरवशाली परंपरेनं नटलेलं आणि सौंदर्यानं सजलेलं उदयपूर शहर जर व्यवस्थित बघायचं म्हटलं तर दिवस नक्कीच अपुरे पडतील. तेव्हा आजची ही भेट इथेच संपवून पुढच्यावेळी भेटू अशाच एका वैभवशाली परंपरा असलेल्या शहरात.
राजेंद्र खडपे
Comments
Post a Comment